कोपरगाव सबजेलमध्ये आरोपींमध्ये हाणामार्‍या

दोघाविरूध्द गुन्हा दाखल
कोपरगाव सबजेलमध्ये आरोपींमध्ये हाणामार्‍या

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तहसीलच्या आवारात असलेले सब जेलच्या बॅरेक नंबर 4 मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामधील आरोपींचे एकमेकांशी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत शाहरुख सत्तार खान याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव सब जेलच्या बॅरेक क्रमांक चार मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी शाहरुख सत्तार खान, अक्षय थोरात उर्फे बजरंग व रोहीत खरात होते. आरोपी अक्षय थोरात व रोहित खरात हे दोन्ही आरोपी फिर्यादी शहारुख सत्तार खान याला सशिवीगाळ केली असता त्यावेळी फिर्यादी समजावुन सांगत असतांना शिवीगाळ करु नका असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपीनी फिर्यादीचे तोंडावर, नाकाला जबर दुखापत करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली.

शाहरुख खान याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुरजि.नं व कलम / 2021 भा.द.वि.कलम 325, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.