
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उपकारगृहात (Sub Prison) शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास शिर्डी (Shirdi) विठ्ठलवाडी येथील आरोपी रोशन वाल्मिक सोनवणे हा या कारागृहात (Prison) असलेल्या आरोपीस सुरा पूरवताना आढळून आला. पोलिसांच्या (Police) ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
कोपरगाव (Kopargav) शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृह असून यात 7 बराकी आहे. यात आरोपीना ठेवण्याची क्षमता केवळ 25-30 आहे. मात्र या ठिकाणी बर्याच वेळा गंभीर गुंह्यातील 35-40 आरोपींना ठेवण्यात येते. गत महिन्यात याठिकाणी जवळपास एकूण 90 च्यावर आरोपी जेरबंद होते. त्यात कोपरगाव शहर, तालुका पोलीस ठाणे, (Police Station) शिर्डी, राहाता, लोणी, श्रीरामपूर आदी ठिकाणच्या गंभीर गुन्ह्यातील 35 आरोपींचा समावेश होता.
यात प्रामुख्याने शिर्डी (Shirdi) येथील सुरज ठाकरे यांच्यावर गोळीबार (Firing) केलेला आरोपी किरण हजारे, तनवीर रंगरेज, आकाश लोखंडे आदींसह शिर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिंगटोन प्रकरणातील सागर शेजवळ खून प्रकरणातील आरोपी सोमनाथ वाडेकर, रामा जाधव, दीपक मांजरे, शोएब शेख, किरण आजबे, विशाल कोते आदींचा समावेश आहे. याशिवाय लोणी येथील पोलीस ठाण्यातील (Police Station) धोकादायक आरोपी शाहरुख सत्तार खान आदींचा समावेश होता. त्यामुळे येथील आरोपी बाबत किती गंभीरता यायला हवी मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली असून दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास तेथे घडली. पो.ना. मारुती गंभीरे, पो.कॉ. सुकटे, श्री. काठे, एस. एस. मोरे आदी पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना उपकारागृहाच्या जवळ शिर्डी (Shirdi) येथील संशयित रोशन सोनवणे हा तरुण फिरताना आढळून आला. तो त्याच्याकडे असलेला लोखंडी सुरा एका गंभीर गुंह्यातील आरोपीस पूरवताना आढळून आला आहे. ही बाब वेळीच पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांच्या लक्षात आणून दिली.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav Police Station) शिर्डी पोलीस ठाण्याचे (Shirdi Police Station) पोलीस नाईक मारुती लहानु गंभीरे यांनी गु.र.नं. 85/2023 शस्र अधीनियम 1959 चे कलम 4, 25 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करत आहेत.
बर्याच वेळा येथे आरोपीना भेटण्यास येणार्या नातेवाईक आणि त्यांच्या संबंधीत इसमाकडून भ्रमणध्वनी, गांजा, अफू व तत्सम विविध अवैध सेवासुविधा पूरविण्यात तेथील संबंधित अधिकारी आपला हात साफ करताना वेळोवेळी दिसून येत आहेत. आरोपींना भेटण्यास मोठी बिदागी संबंधीताना मोजावी लागते. या ठिकाणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे रात्रीतून दोनदा भेट देऊन या गुन्हेगारीवर लक्ष ठेवत असत मात्र वर्तमानांत त्याची वानवा दिसत आहे.