त्या रात्री रुग्णालयात गैरहजर असलेले कर्मचारी, डॉक्टर यांनाही तात्काळ निलंबीत करावे

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आज ढोल बजाव सत्याग्रह- काळे
त्या रात्री रुग्णालयात गैरहजर असलेले कर्मचारी, डॉक्टर यांनाही तात्काळ निलंबीत करावे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाला अपरात्री दिलेल्या भेटी दरम्यान महिला कर्मचा़र्‍याला अपशब्द वापरले, विनयभंग केला म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला; मात्र त्या रात्री कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात गैरहजर असलेले कर्मचारी, डॉक्टर तसेच हजर असून, कर्तव्याचे दरम्यान खोलीचे द्वार बंद करून झोपलेल्या कर्मचार्‍यांना देखील तात्काळ निलंबीत करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात संजय काळे यांनी म्हटले आहे, हा गुन्हा दाखल होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचार्‍यांनी सत्याग्रह केला. जर तहसीलदारांनी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन ते बडतर्फ झालेच पाहिजे; तहसीलदार ग्रामीण रुग्णालयात अपरात्री भेटीला गेले असता त्यांच्या गाडीचे चालकाने त्यांचे संभाषणाचे व दवाखान्यातील कर्मचा़र्‍यांसोबतचे दोन व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले आहे.

एका चित्रफितीमध्ये दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका कर्मचा़र्‍याला डॉक्टर किंवा नर्स असल्याबाबत प्रश्न विचारला. तो कर्मचारी व तहसिलदार यांनी नर्सला मोठ्या आवाजात हाका मारल्या. नर्स एका रूममध्ये दार बंद करून झोपलेल्या होत्या. तहसीलदारांनी रुग्णांना देखील त्रास दिला, असे समाज माध्यमांवरील बातम्यांत ऐकण्यात आले. म्हणजे रुग्णालयात रुग्ण असताना कर्तव्यातील कर्मचारी रात्रपाळीला झोपले कसे? ते देखील खोलीचे दार बंद करून त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, त्याची दखल कोण घेणार? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

तहसीलदार यांनी महिला कर्मचार्‍याला ड्युटी रजिस्टर मागितले. त्यात ग्रामीण रुग्णालयात 52 चा स्टाफ असताना, रात्रीच्या वेळेस संपूर्ण दवाखाना केवळ एकाच नर्सच्या भरवश्यावर सोडल्याचे त्या चित्रफितीत स्पष्ट दिसते. कर्तव्यात असलेले इतर डॉक्टर व स्टाफ दवाखान्यात नसल्याचे तहसीलदारांनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे.

तेवढ्या रात्री त्यांनी मेडीकल सुप्रीटेंडेंट अर्थात वैद्यकीय अधीक्षक यांना फोन केल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते. जर शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून डॉक्टरांसाठी निवास आवारातच बांधलेले आहे. तर डॉक्टर आवारात का निवास करीत नाही? त्या रात्री वैद्यकीय अधीक्षक यांनी आपले मुख्यालय कसे सोडले? रात्री दवाखान्यात एक देखील डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नाही याला ग्रामीण रुग्णालय म्हणायचे काय? असे सवाल उपस्थित केले.

कर्तव्यातील खासगी प्रॅक्टीस करणारे व ग्रामीण रुग्णालयात केवळ काही तासांसाठी ऑन कॉल येणार्‍या डॉक्टरांना देखील तात्काळ बडतर्फ करावे. अशाप्रकारे तहसीसलदारांनी केलेल्या स्टींग ऑपरेशनला जर उत्तर विभागातील संघटीत गुन्हेगारी देत असेल तर माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर आपण आयपीसी 353 च लावणार?

तहसीलदारांवर गुन्हा दाखल करून कार्यालयाचे कर्मचा़र्‍यांना तर अभय देत नाही ना? जर तहसीलदारांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण रात्रीच्या वेळेस कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात हजर नसलेले सगळेच गुन्हेगार आहेत. त्यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा आज दि. 28 फेबु्रवारी 2023 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेश द्वारासमोर गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांचेवर फौजदारी गुन्हा व बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी तसेच वैद्यकीय अधीक्षक यांनी मुख्यालय सोडल्याबाबत गुन्हा दाखल होण्यासाठी ढोल बजाव सत्याग्रह करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com