कोपरगावच्या शेतकरी संघाचा खत विक्री परवाना निलंबित

जिल्हा कृषी अधीक्षकांचे आदेश
कोपरगावच्या शेतकरी संघाचा खत विक्री परवाना निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोपरगाव (Kopargav) येथील शेतकरी सहकारी संघाच्या (Farmers Cooperative Union) खत विक्री केंद्रामध्ये (Fertilizer sales center) त्रुटी आढळून आल्याने सदरचा खत विक्री परवाना (Fertilizer sales license) एक महिन्यासाठी निलंबित (Suspended) करण्यात आला आहे. याबाबत खते परवाना अधिकारी तथा जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप (District Agriculture Superintendent S. S. Jagtap) यांनी आदेश काढले आहेत.

शेतकरी सहकारी संघ लिमिटेड (Shetkari Sahakari Sangh Ltd.) यांच्या खत विक्री केंद्राबाबत शरद मुरलीधर बळवंत (रा. बोलकी, ता. कोपरगाव) यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी 17 मे रोजी केंद्राल भेट देऊन तपासणी केली. तपासणीमध्ये एकाच खरेदीदाराचे नावे अधिक खत विक्री नोंदविणे, ई-पास मशीनचा वापर न करणे, खरेदी बिले उपलब्ध नसणे, साठा रजिस्टर व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री बिले विहित नमुन्यामध्ये नसणे, विक्री बिलांवर शेतकर्‍यांची स्वाक्षरी न घेणे तसेच सर्व मजकूर न लिहिणे, विक्री अहवालाच्या प्रति वरिष्ठ कार्यालयास सादर न करणे आदी त्रुटी आढळून आल्या.

यामुळे कृषी अधीक्षक जगताप यांनी सदरचा खत व्यवसाय परवाना 2 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीसाठी निलंबित केला आहे. सदरचा आदेश मान्य नसल्यास विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांच्याकडे अपिल दाखल करण्याचे आदेशात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com