बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 84 हजारांची चोरी

बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 84 हजारांची चोरी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील संवत्सर येथे काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख 80 हजारांची रक्कम

व सोन्या चांदीचे दागिने व अन्य चीज वस्तू असा तब्बल 01 लाख 84 हजारांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी पूजा प्रशांत आहेर रा.लोणी,ता.राहाता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपली आजी ह्या संवत्सर शिवारात राहत असून आपण राहाता तालुक्यातील लोणी याठिकाणी राहत आहे.

आपली आजी काही कारणानिमित्त बाहेर गावी गेल्याची संधी साधून रविवारी रात्री व पहाटे दीड वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाट व अन्य चिजवस्तूंची उचक पाचक करून त्यातील रोख 80 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने व अन्य चीजवस्तू घेऊन पोबारा केला आहे.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम 457,380 प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षकदीपक बोरसे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com