कोपरगावमध्ये रस्त्यावरून राजकीय चिखलफेक !

कोपरगावमध्ये रस्त्यावरून राजकीय चिखलफेक !

न्यायालयाची स्थगिती उठवून शहराची बदनामी थांबवा- नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे (Due to poor road conditions) नागरिकांचे होणारे हाल व 28 विकास कामांना उच्च न्यायालयाने (High Court) दिलेली स्थगिती (Postponement) हे विषय चर्चेचे होऊन सर्वत्र कोपरगाव शहराची बदनामीही (Kopargaon city Notoriety) होत आहे. नागरिकांचे हाल होत असताना चालू असलेले आरोप (Allegations)-प्रत्यारोप यामुळे सर्वच राजकारणीही बदनाम होत आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती (High Court Postponement) मिळविणार्‍या सर्वांनाच विनंती करतो, आतापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप, मान अपमान, राजकीय हेवेदावे विसरून उच्च न्यायालयातून आणलेली स्थगिती उठविण्यासाठी अर्ज देऊन स्थगिती उठवावी, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी केले आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) म्हणाले, न्यायालयाने दिलेली स्थगिती (Postponement) उठविल्यानंतर सर्व पक्षांचे गटनेते व 2 त्रयस्थ तज्ज्ञांची समिती नेमून सर्व कामे दर्जेदार करून घेऊ. इस्टीमेट कितीही रकमेचे असले तरी जेव्हढे काम होईल तितकेच मोजमाप करून ठेकेदारांची देयके अदा करू. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात. तरी आपण कुणीही एकमेकांचे शत्रू नाही. निवडणूक (Election) येईल त्यावेळी प्रत्येकाला आपल्या पक्ष-गटाचे समर्थन करण्याचा अधिकार आहे.पण राजकीय हेवे दाव्यांचा अतिरेक होऊन आपण सर्वजण जनतेच्या मनातून कायमचे उतरायला नको इतके तरी भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

आज मी कुणावरही दोषारोप करणार नाही. शहरात विकासकामे व्हावीत हेच महत्वाचे आहेे. स्थगिती उठवून कामे झाली नाहीत तर येणार्‍या नगरपरिषद निवडणुकीनंतरही असेच गढूळ वातावरण राहिले. एकमेकांना अडथळे आणले गेले तर ते कोपरगाव शहराच्या (Kopargav City) विकासाच्यादृष्टीने योग्य होणार नाही. श्रेय हा विषय मला मान्य नाही. कारण मतदारांनी सर्वांना विकास कामे करण्यासाठीच निवडून दिलेले असते. सर्वांच्याच सहकार्याने विकासकामे मार्गी लागत असतात असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी म्हटले आहे.

जनतेचा कळवळा, ही तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका- साठे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रास सहन करीत आहेत. या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी देऊन देखील या रस्त्यांच्या कामांना विरोध करण्यासाठी आपल्या नगरसेवकांना न्यायालयात पाठवायचे व दुसरीकडे नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी काही संघटनांनी या खड्ड्यात मुरूम टाकला तर चिखल झाला म्हणून ओरडायचे व जनतेची काळजी असल्याचा खोटा कळवळा दाखवायचा ही कोल्हे यांची दुतोंडी भूमिका असल्याची टीका सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष रावसाहेब साठे यांनी केली आहे.

कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी काही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मुरूम टाकून खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या यातना कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे या मुरुमाचा काही ठिकाणी चिखल झाला. यावरून कोल्हेंनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी दाखवून प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. त्याबाबत साठे यांनी नागरिकांची काळजी होती तर 28 विकासकामांना विरोध का केला? असा सवाल विचारला असून नागरिकांची जर तुम्हाला एवढी काळजी आहे तर ज्या संघटनांनी त्या खड्ड्यात मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला त्याठिकाणी डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करावे तुम्हाला कोणी अडवले, असा प्रतिप्रश्न केला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत ठराव कधी झाला,28 विकासकामांना कोपरगाव नगरपरिषदेने मंजुरी देऊन किती दिवस झाले. मागील एक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास नागरिक सहन करीत असताना तुम्हाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाटली नाही का? तुम्हाला जर जनतेच्या आरोग्याची खरंच काळजी असती तर तुम्ही जिल्हाधिकार्‍यांनी 28 विकासकामांना दिलेल्या मंजुरीला न्यायालयात आवाहन दिलेच नसते. हे कोपरगावची जनता जाणून आहे त्यामुळे यापुढे दुतोंडी भूमिका घेऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बंद करा व नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे साठे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com