
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरात प्रभाग क्र. 2 मधील आढाव घर ते नगर - मनमाड महामार्ग रस्त्याची दुर्दशा झाली असून सदर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, अशा आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, प्रभाग क्रमांक 2 मधील आढाव घर ते नगर-मनमाड महामार्ग रस्ता अत्यंत वर्दळीचा असून हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने नागरिकांना ये जा करणे अवघड झाले आहे. रस्त्याने जाणार्या महिला, ज्येष्ठ नागरीक व शाळा महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जानकी विश्व, निवारा, रिद्धीसिद्धी नगर, तसेच सुभद्रा नगर भागाला जोडणारा हा रस्ता नागरिकांसाठी महत्वाचा आहे.
पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. जर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम झाले नाही तर पावसाळ्यात मोठ्या समस्या निर्माण होवू शकतात. त्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने या रस्त्याचे पावसाळयापूर्वी काम पूर्ण करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अनिरुद्ध काळे, कृष्णा आढाव, अनंत डिके, विजय बागडे, राजेश सावतडकर, विशाल निकम, अंकुश लासनकर, सोमनाथ आढाव, अनिल मैंद, सचिन थोरे, कार्तिक सरदार, ऋतुराज काळे, संजय लोहारकर आदी उपस्थित होते.