कोपरगावमध्ये लस न घेणारांवर दंडात्मक कारवाई

तहसीलदार विजय बोरुडे यांनी दुकानात जाऊन केली धडक कारवाई ; व्यापारी व नागरिकांची धावपळ
कोपरगावमध्ये लस न घेणारांवर दंडात्मक कारवाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शासकीय आदेशानुसार प्रत्येक नागरिकाने करोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) घेणे बंधनकारक असताना काही बेफिकीर नागरिकांना (People) अजूनही या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने तहसीलदार विजय बोरुडे (Tahsildar Vijay Borude) यांनी बुधवार दि. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रत्यक्ष शहरातील बाजारपेठेत जाऊन आस्थापना मालक, कामगार व बाजारपेठेतील नागरिकांनी लसीकरण (People Vaccination) केले आहे की नाही याची पाहणी करत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई (Punitive Action) केल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे.

करोना महामारीसोबतच अवघ्या जगात ओमीक्रॉन या नव्या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. यातून बचावासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने प्रत्येक नागरिकाने लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असताना अजूनही काही बेफिकीर नागरिकांना याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पथकाने शहरातील आस्थापनांत जाऊन त्या अस्थापनाच्या मालकाची, कामगारांची व तेथे खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे की नाही याची प्रत्यक्ष प्रमाणपत्र पाहत पाहणी केली.

यावेळी अस्थापनातील कामगारांनी लस घेतलेली नसेल तर त्या कामगारास 500 रुपये दंड तर दुकान मालकास 10,000 रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच मास्क न वापरणार्‍या नागरिकांकडून 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने अनेक दुकान मालकांना प्रशासनाने अचानकपणे लसीकरण तपासणी मोहीम सुरू केल्याने दुकान मालक, कामगार व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाते, कामगार तलाठी ठेंगडे, आदींसह महसूल, पोलीस अधिकार्‍यांसह मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com