
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
मिनी विधानसभा समजल्या जाणार्या जिल्हा परिषद, पंचायत संमिती निवडणूकांसाठी गट व गणांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे दहा गण होते. नवीन आराखड्यानुसार कोपरगावात आता जिल्हा परिषदेच सहा गट तर पंचायत समितीचे 12 गण करण्यात आले आहेत. पुर्वीचा चांदेकसारे व शिंगणापूर गटातील काही गावे तोडून पोहगाव गटाची नव्याने निमीती करण्यात आली आहे. या गटाचे पोहगाव व काळपेवाडी हे दोन गण आहे. ही प्रारूप आराखडा जिल्हाधिकार्यांनी प्रसिध्द केला असून यावर 8 जून पर्यंत हारकती मागविण्यात आल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील गट व गण निहाय प्रसिध्द झालेला प्रारूप आराखडा पुढील प्रमाणे -
सुरेगाव गट - या गटात धामोरी व सुरेगाव गणांचा समावेश आहे. धामोरी गणात धामोरी, मोर्विस, चासनळी, मंजुर, मायगावदेवी, वडगाव, बक्तरपूर, हांडेवाडी, कारवाडी या गावाचा समावेश असून सुरेगाव गणात सुरेगाव, सांगवीभुसार, मळैगाव थडी व वेळापूर या गावांचा समावेश आहे. पुर्वीच्या सुरेगाव गटामधून रवंदा व सोनारी ही दोन गावे वगळण्यात आली असून ती शिंगणापूर गटाला जोडली आहे.
शिंगणापूर गट - या गटात शिंगणापूर व ब्राम्हणगाव गणाचा समावेश असून ब्राम्हणगाव गणात ब्राम्हणगाव, रवंदे, सोनारी, धारणगाव, नाटेगाव या गावाचा समावेश आहे. तर शिंगणापूर गणात शिंगणापूर, खिर्डी गणेश, येसगाव व टाकळी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. पुर्वी असलेल्या ब्राम्हणगाव गटाचे रूपांतर आता शिंगणापूर गटात करण्यात आले आहे. पुर्वीच्या ब्राम्हणगाव गटातील दहेगाव बोलका, आंचलगाव, ओगदी, बोलकी, करंजी, पढेगाव, शिरसगाव, कासली, गोधेगाव, तिळवणी, सावळगाव व आपेगाव ही गावे करंजी गटाला जोडण्यात आली आहे.
करंजी बुद्रुक गट - या गटात करंजी व दहेगाव बोलका गणांचा समावेश. करंजी बुद्रुक गणात करंजी ब्रुद्रुक, ओगदी, बोलकी, आपेगाव, पढेगाव, शिरसगाव, सावळगाव, उक्कडगाव, तिळवणी, आंचलगाव व कासली या गावाचा समावेश आहे. तर दहेगाव बोलका गणात दहेगाव बोलका, गोधेगाव, घोयेगाव, तळेगाव मळे, लौकी, धोत्रे, भोजडे, खोपडी व कान्हेगाव या गावांचा समावेश आहीे. करंजी हा नवीन गट तयार करण्यात आला असून यात उक्कडगाव, घोयेगाव, तळेगाव मळे, लौकी, धोत्रे, भोजडे व कान्हेगाव ही पुर्वीच्या वारी गटाची गावे करंजी गटाला जोडण्यात आली आहेत.
संवत्सर गट - या गटात संवत्सर व कोकमठाण ही दोन गण येतात. यातील संवत्सर गणात संवत्सर, सडे, वारी तर कोकमठाण गणात कोकमठाण, जेऊर पाटोदा व मुर्शतपूर आदी गावाचा समावेश करण्यात आला आहे. पुर्वीचा असलेला वारी गट रद्द करून नव्याने संवत्सर गटाची निर्मीती करण्यात आली आहे. या गटाला नव्याने पुर्वीच्या शिंगणापूर गटातील जेऊर पाटोदा व मुर्शतपूर ही गावे जोडण्यात आली आहे.
पोहेगाव गट - या गटात पोहेगाव व कोळपेवाडी गणांचा समावेश आहे. यात पोहेगाव गणात पोहेगाव बुद्रुक, पोहेगाव खुर्द, देर्डे चांदवड, घारी, डाऊच बुद्रुक, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी आदी गावाचा समावेश करण्यात आला असुन कोळपेवाडी गणात कोळपेवाडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, कोळगाव थडी, हिंगणी, चांदगव्हाण, शहाजापूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पुर्वीच्या चांदेकसारे गटातील देर्डे चांदवड, घारी, डाऊच खुर्द व जेऊर कुभारी ही गावे तर पुर्वीच्या शिंगणापूर गटातील कोळपेवाडी माहेगाव देशमुख, कुंभारी, काळेगाव थडी, हिंगणी, चांदगव्हाण शहाजापूर यरा गावाचा समावेश नव्याने तयार करण्यात आलेल्या पोहेगाव गटात करण्यात आला आहे.
चांदेकसारे गट - चांदेकसारे गटात चांदेकसारे व रांजणगाव देशमुख गण येतात. चांदेकसारे गणात चांदेकसारे, शहापूर, मढी बुद्रुक, मढी खुर्द, देर्डे कोर्हाळे, सोनेवाडी आदी गावाचा समावेश आहे. तर रांजणगाव देशमुख गणात मनेगाव, काकडी, मल्हारवाडी, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, जवळके, बहादराबाद व बहादरापूर या गावाचा समावेश करण्यात आला आहे. पुर्वीच्या चांदेकसारे गटातील पोहेगाव बुद्रुक, पोहेगाव खुर्द, घारी, जेऊर कुंभारी, देर्डे चांदवड व डाऊच खुर्द ही गावे वगळण्यात आली असून ती नव्याने तयार झालेल्या पोहेगाव गटाला जोडण्यात आली आहे.