कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरात नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली . थर्माकोल, प्लास्टीकला बंदी असताना

विक्री प्रकरणी व्यापार्यांवर नगरपालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 40 किलो प्लास्टीक जप्त केले आहे. दरम्यान या कारवाई 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

कोपरगाव शहरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना शहरात एका ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा असल्याचे नगरपालिका प्रशासनास कळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन 40 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करून व्यापार्यावर कारवाई केली . मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील अरण, मनोज लोट, रणधीर तांबे, चंद्रकांत साठे यांनी ही कारवाई केली. 30 मार्च रोजी व्यापारी धर्मशाळा याठिकाणी ही तपासणी मोहीम पालिकेने राबविली होती.

राज्यात प्लास्टीक व थर्माकोल अविघटन शिल वस्तूच्यां वापरावर, उत्पादनावर, विक्री, हाताळणी, साठवणुकीवर बंदी असताना शहरातील अनेक व्यापार्यांनी त्याची विक्री केली. यामुळे शहरातील 5 ते 6 व्यापार्यांकडून प्लास्टीक जप्त करून दंडात्मक कारवाई करून चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीची मोहीम वेळोवेळी राबण्याचा प्रयत्न केला परंतु काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे ही मोहीम थंडावली होती. हात गाडीवर अनेकदा प्लास्टिक मिळून येते परंतु किमान पाच हजारांचा दंड करायचा म्हटले तर त्या हात गाडीवर संपूर्ण मालाची किंमत ही तेवढी नसते त्यामुळे आमचा कारवाई करताना नाईलाज होतो.

परंतु आता यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. तेव्हा हात गाडी वाल्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होईल. अशाच प्रकारची कारवाई शहरात दररोज वेगवेगळ्या भागात राबविण्यात येणार असल्याचे या मोहिमेचे व आरोग्य विभागाचे प्रमुख आरणे यांनी सांगितले.