
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव न्यायालयात नुकतेच लोकन्यायालय संपन्न झाले. त्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यात पूर्व ताड जोडीसह 1 हजार दावे निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी दिली आहे.
महा लोकन्यायालयात बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायतीच्या थकबाकीतील वसुल्या, मोटार अपघात प्रकरणे, या खेरीज न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी, भूसंपादन, महसूल, फौजदारी प्रकरणे ठेवली गेली होती. लोकन्यायालयाचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्या. सयाजी कोर्हाळे यांच्या हस्ते तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एस.एन.सचदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
नगरपरिषदा, महावितरण कंपनी, बँका, पतसंस्था, ग्रामपंचायती आदींच्या वसुल्या या मोठ्या जिकरीच्या बनल्या आहेत. त्यातून वाद निर्माण होत असून त्याचा अधिकचा भार हा न्यायव्यवस्थेवर पडत आहे. पुढे हेच दावे कोटीच्या संख्येने साचून त्यातून कायद्यावरच बोट ठेवले जाते. त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाने हे तडजोड पूर्व दावे निकाली काढण्यासाठी या लोक न्यायालयांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रसंगी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश स. बा.कोर्हाळकर, दिवाणी न्या. एस.एन.सचदेव, न्या.ए.सी.डोईफोडे, न्या. आर.ए. शेख, न्या. जे.एम.पांचाळ, न्या.व्ही.यु.मिसाळ यांचे सह सहा न्यायाधीशांचा गट कार्यरत होता. तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, गटविकास अधिकारी एस. डी.सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, वकील संघाचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे आदी उपस्थित होते.
त्यात जिल्हा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी,न्या.शेख यांच्या न्यायालयातील दिवाणी व भूसंपादन व फौजदारी तडजोड प्रकरणे, तर दिवाणी क्रं.2 मधील राष्ट्रीय बँका, पतसंस्था, ग्रामपंचायत, भारत संचार निगम व सहकार न्यायालयातील प्रकरणे, तर पाच क्रमांकाच्या टेबलवर श्रीमती सचदेव यांच्या न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, व न्या.डोईफोडे यांच्या समोरील कलम 138 मधील धनादेश न वटल्याची तसेच न्या. श्री मिसाळ यांच्या समोरील फौजदारी तडजोडीची प्रकरणे, नगरपरिषद वसुली प्रकरणे या शिवाय सहा क्रमांकाच्या टेबलवर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे समोरील नगरपरिषदेचे सर्व दाखल पूर्व प्रकरणे,सात व आठ क्रमांकाच्या टेबलावर तहसीलदार विजय बोरुडे व नायब तहसीलदार कुलकर्णी यांचे समोर तहसील कार्यालयाची सर्व दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे आदींचा समावेश होता.
गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विद्यासागर शिंदे, जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील अशोक वहाडणे, वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी, शंतनू धोर्डे, अशोक टुपके, अॅड.एस.एम.वाघ, अॅड. मच्छीन्द्र खिलारी, अॅड. एस.एम.गुजर, बी.डी.पानगव्हाणे, माजी अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे, अॅड. अशोक टुपके, भास्कर गंगावणे, अॅड. दिलीप लासुरे, अॅड. पी.सी.धाडीवाल, गौरव गुरसळ, अॅड. एस.एम.सांगळे, अॅड. योगेश खालकर, अॅड.व्ही.टी.सुपेकर, अॅड. बाबासाहेब सोनवणे,अॅड. बाळासाहेब कडू, अॅड. गुजराथी, अॅड.एस.के.जाधव, अॅड. विलास गोरे, अॅड. एम.एल.मोरे, अॅड.सौ.एस.एस.देशमुख, अॅड. काटे आदींसह वकील व सरकारी वकील, दावेदार बँका,महावितरण,कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक अॅड. अशोक टुपके यांनी केले तर सुत्रसंचलन अॅड.अशोक वहाडणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचा सत्कार अॅड.जयंत जोशी यांनी केला आहे. शेवटी उपस्थितांचे आभार अॅड.शंतनू धोर्डे यांनी मानले आहे.