कोपरगावात ऑक्सिजन प्लांन्ट सुरू करण्यासाठी एकमत

कोपरगावात ऑक्सिजन प्लांन्ट सुरू करण्यासाठी एकमत

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

करोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून दिवसागणिक मृत्युचा आकडा वाढत आहे. कोपरगावातही मृत्युच्या संख्येत माठी वाढ हात आहे. हे सर्व मृत्यु ऑक्सिजन अभावी होत असल्याने तालुक्यातील नागरीकांची काही प्रमाणात गरज भागवेल यासाठी ऑक्सिजन प्लांन्ट उभारण्यासंदर्भात नगराध्य विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ऑक्सिजन प्लांन्ट उभारण्यासंदर्भात एकमत झाले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याने रुग्णासंख्या वाढून मृत्युचे प्रमाणही वाढतच आहे. सर्वत्र हाहाकार उडालेला आहे. इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही हॉस्पिटल बंदच करावे लागतील अशी परिस्थिती आहे. कोपरगावमध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारून ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सहविचार सभा आयोजित केली होती.

यावेळी काका कोयटे, राजेश परजणे, नितीनराव औताडे, अरविंदजी भन्साळी, राजेशजी ठोळे, डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ.योगेश कोठारी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, डॉ.फुलसुंदर, विजय बडजाते, अजिंक्य भन्साळी, राजकुमार बंब, सुधीर डागा, रिकबशेठ शिंगी आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांगिण विचारविनिमय होऊन लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांन्ट उभा करण्यावर एकमत झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com