कोपरगाव : नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना 5 लाखाचे विमा कवच
कोपरगाव

कोपरगाव : नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना 5 लाखाचे विमा कवच

विकास कामांना स्थायी सभेमध्ये मंजूरी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना योद्धे म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा 5 लाखाचा विमा, नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणार्‍या विकास कामांना स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये मंजुरी दिल्याची माहिती उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली.

राज्यात करोनाच्या महामारीमुळे बाधीत झालेल्या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना नगरपरिषदेमार्फत आरोग्यविषयक पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. त्यातच करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे..भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेकडे आरोग्य विषयक सुविधा शहरवासियांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी केली त्या मागणीस ऑनलाईन सभेमध्ये ठेवलेल्या सर्व विषयांना मंजुरी देऊन या माध्यमातून कोपरगांवकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे.

करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचा करोना योद्धा म्हणून पाच लाखाचा विमा उतरविण्याचा निर्णयही सभेमध्ये घेण्यात आल्याने या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना याचा लाभ होणार आहे. या सर्व विषयांना भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी सभेमध्ये मंजूरी दिलेली असून याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष निर्णय घेतात की नाही याकडे कोपरगांवकरांचे लक्ष लागलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com