नवीन प्रक्रियेत कोपरगाव-नगर महामार्ग भूसंपादनासाठी तरतूद करावी - निर्मळ

नवीन प्रक्रियेत कोपरगाव-नगर महामार्ग भूसंपादनासाठी तरतूद करावी - निर्मळ

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

ब्रिटीशकालिन काँक्रीटचा सिंगल वे असलेला नगर-कोपरगाव रस्त्याचे स्वातंत्र्यानंतर एकदाही भुसंपादन झालेले नाही. भुसंपादन न होताच या रस्त्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतजमिनी जात आहे. पहिला ठेकेदार पळाल्यानंतर लवकच नव्याने कामाचे अदांजपत्रक तयार होत असून या नवीन प्रक्रियेमध्ये भुसंपादनाचीही तरतूद करावी, अशी मागणी राहाता तालुका असंघटीत काँग्रेस कामगार संघांचे अध्यक्ष सुभाष निर्मळ यांनी केली आहे.

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरु होते. मात्र संबंधित कंत्राटदार काम अर्धवट सोङुन पळून गेला. त्यामुळे केंद्र सरकारकडून यासाठी नव्याने अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया राबवित आहे. कामास प्रत्यक्ष जानेवारीत सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या रस्त्यासाठी ब्रिटीश काळापासून भुसंपादन झालेले नाही. स्वातंत्र्यानंतर राज्य महामार्ग क्र. 10 असणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे व त्यानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला. एकदाही भूसंपादन न करताच हा रस्ता जवळपास शंभर फुट रूंदीचा करण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या शेतजमीनी रस्त्यासाठी परस्पर घेण्यात आल्या आहेत.

त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नव्याने अंदाजपत्रक व निविदा प्रक्रीया राबविली जात आहे. यामध्ये रस्त्यासाठी जमिनीचा सर्वे व्हावा, आवश्यक जमिनीचे संपादन व्हावे. शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळावा, नवीन प्रक्रीयेत भुसंपादनाची तरतूद करावी, अशी मागणी पिंपरी निर्मळ येथील सुभाष निर्मळ यांचेसह शेतकर्‍यांनी केली आहे. मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही पाठविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com