
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव नगरपरिषद नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी पालिका प्रांगणात उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यात 15 प्रभागांत 30 जागा असून 15 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 9 प्रभाग सर्वसाधारण जागांसाठी, 5 प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव व 1 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना, आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली.
सोमवारी कोपरगाव नगरपालिका उर्दू शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आयेशा फिरोज शेख हिच्या हस्ते अनुसूचित जाती जागेसाठी आरक्षण सोडत चिठ्ठीव्दारे काढण्यात आली.
आरक्षण सोडत खालील प्रमाणे-
प्रभाग क्र. 1 टाकळी रोड- जागा- 1 सर्वसाधारण (महिला) जागा -2 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 सप्तश्रृंगी- जागा-1 अनुसूचित जाती (महिला) जागा-2 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 3 सिद्धिविनायक- जागा- 1 सर्वसाधारण (महिला) जागा-2 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 4 तुळजाभवानी- जागा-1 सर्वसाधारण (महिला) जागा-2 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 साई जागा-1 अनुसूचित जमाती जागा-2 सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्र. 6 अंबिका- जागा-1 सर्वसाधारण (महिला) जागा-2 सर्वसाधारण प्रभाग क्र. 7 छत्रपती शिवाजी महाराज जागा-1 सर्व साधारण महिला (महिला) जागा-2 सर्वसाधारण, प्रभाग क्र. 8 लक्ष्मीमाता जागा- 1 अनुसूचित जाती (महिला) जागा-2 सर्वसाधारण प्रभाग क्र. 9 भगवती माता- जागा- 1 अनुसूचित जाती जागा- 2 सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्र. 10 वरदविनायक- जागा-1 सर्व साधारण (महिला) जागा- 2 सर्वसाधारण प्रभाग क्र. 11 श्रीराम- जागा-1- अनुसूचित जाती (महिला) जागा-2- सर्वसाधारण प्रभाग क्र. 12 माता वैष्णवदेवी- जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2- सर्वसाधारण प्रभाग क्र. 13 गोदावरी- जागा-1- सर्वसाधारण (महिला) जागा-2 सर्वसाधारण प्रभाग क्र. 14 संत गोरोबाकाका- जागा-1 सर्व साधारण (महिला) जागा-2 सर्वसाधारण प्रभाग क्र. 15 शुक्राचार्य- जागा-1 अनुसूचित जाती‘ जागा-2 सर्वसाधारण (महिला) असे आरक्षण सोडतीत निघाले आहे. या आरक्षण सोडतीवर दि. 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती घेता येतील. त्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थितीत सोमवारी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सोडत काढण्यात आली. यासाठी ज्ञानेश्वर चाकणे, संजय तिरसे, रवींद्र वाल्हेकर, महारुद्र गलाट, तुषार नालकर, रोहित सोनवणे, प्रदीप घाडगे, मुकेश मिरीकर, दीपक बडगुजर, प्रशांत उपाध्ये, राजेंद्र इंगळे या पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले.