नळ कनेक्शन दिले नाही आणि दोन वर्षांपासून दिली जात आहे पाणीपट्टी

कोपरगाव पालिकेचा अजब कारभार
नळ कनेक्शन दिले नाही आणि दोन वर्षांपासून दिली जात आहे पाणीपट्टी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वारंवार मागणी अर्ज देऊन, तसेच नळ कनेक्शन (Tap connection) घेण्यासाठी अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून आणि रक्कम भरून देखील नळ जोडणी केली नाही. आणि दोन वर्षांपासून नळपट्टी (Tap Water Bill) पाठवण्यात येत असल्याने संतप्त नागरिकाने कोपरगाव पालिका कार्यालय (Kopargaon Municipal Office) गाठत नगर परिषदेचा अजब कारभार (Strange affairs of the Municipal Council) समोर आणला आहे.

शहरातील समतानगर (Samtanagar) येथील रहिवासी नितीन रामचंद्र थोरात यांनी कोपरगाव नगरपरिषदेकडे (Kopargaon Municipal) वारंवार मागणी केली आणि लवकरात लवकर नळ कनेक्शन (Tap connection) मिळावे यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची (Water supply department of the municipality) अनामत रक्कम देखील भरली आहे. परंतु पालिकेने नळ कनेक्शन (Tap connection) जोडले नाही. आणि वार्षिक 1 हजार 650 रुपया प्रमाणे असे दोन वर्षाचे 3 हजार 300 रुपये आणि 2 टक्के शास्ती असे एकूण 3 हजार 598 रुपयांची थकबाकीची बिले पाठवली आहे. अचानक साडेतीन हजारांचे बिल हातात पडल्याने थोरात यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या निमित्ताने पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. मला दोन वर्षात नळकनेक्शन मिळालं नाही आणि थेंबभर पाणी मिळाले नसताना मी पाणीपट्टी का भरावी? नगरपालिकेने पाणीपट्टी माफ करून द्यावी अशी मागणी नितीन थोरात यांनी केली आहे.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या (Water supply department of the municipality) अभियंता ऋतुजा पाटील यांच्याशी विचारले असता पावती झाल्यानंतर पाणीपट्टी आकारली जाते. मात्र त्यांचे नळ कनेक्शन का जोडले गेले नाही याची माहिती घेऊ व नळ कनेक्शन लवकरात लवकर जोडले जाईल असे सांगितलेे. तर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी देखील सदर प्रकरणाची माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे म्हटले.

दरम्यान कोपरगाव पालिकेत नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकारात लक्ष घालून योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com