धामोरीत मोबाईल शॉपी तोडून 50 हजाराची चोरी

धामोरीत मोबाईल शॉपी तोडून 50 हजाराची चोरी

धामोरी |वार्ताहर| Dhamori

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरील समाधान मोबाईल शॉपी दुकानात

काल मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना हुलकावणी देत अज्ञात चोरट्यांनी दुकानावरील पत्रा वाकून आत प्रवेश करून चोरी केली. यात रोख रकमेसह 50 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चारट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

समाधान मोबाईल शॉपी दुकानाचे व परीसरात ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असल्याचा अंदाज चोरट्यांना असल्यामुळे चोरट्याने जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूने प्रवेश केला व दुकानासमोरील शाळेचे तारेचे कंपाऊंड कट करून अमर पोपट जेजुरकर यांचे समाधान वॉच अँड मोबाईल शॉपच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली.

पहिल्यांदा दुकानाचे मेन शेटर उघडण्याचा प्रयत्न केला परंतु मेन शेटरचे लॉक मजबूत असल्यामुळे ते उघडले नाही. नंतर शॉपच्या मागील बाजूस असणार्‍या उंबराच्या झाडाचा आधार घेऊन दुकानावरील पत्रा वाकवुन सिलिंग तोडून आत प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तोडफोड करण्यात आली.

वरील बाजूने दुकानात प्रवेश करताना व कॅमेर्‍याची तोडफोड करण्याचे सर्व फुटेज चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दुकानाच्या मागील बाजूस धामोरी सोसायटीच्या परिसरात चोरट्यांनी वापरलेल्या हत्यारेही पोलिसांना सापडलेली आहे. या चोरीत शॉपीतील मोबाईल जिओ 5, आयटेल 4, सॅमसंग 2, रेलमी 3 कंपनीचे मोबाईल हँडसेट, मेमरी कार्ड 10, हातातील घड्याळे, डिव्हीर 1, हार्ड डिस्क 1, 2 कॅमेरे असा 48 हजाराच्या ऐवज व 8 हजार रोख रक्क्म लंपास केली आहे. पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनेची पाहणी केली व पो. कॉ. काशिद, युवराज खुळे, गवारे, पोलीस पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपासास सुरुवात केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com