कोव्हिड केअर सेंटरसाठी पुरेसा निधी मिळावा
सार्वमत

कोव्हिड केअर सेंटरसाठी पुरेसा निधी मिळावा

आमदार काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

Arvind Arkhade

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून या बाधित रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देता यावी यासाठी एस.एस.जी.एम.येथे सुरू करण्यात आलेल्या व वाढती करोना बाधित रुग्णांची संख्या पाहता आत्मा मालिक येथे सुरू करावयाच्या असलेल्या कोव्हिड केअर सेंटरसाठी पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे

एस. पी. कार्यालय अहमदनगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयोजित केलेल्या करोना आढावा बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी निधीची मागणी करून येत असलेल्या अडचणींकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी आ.काळे यांनी पालकमंत्र्यांना कोपरगाव तालुक्यातील करोनाच्या उपाय योजनांची माहिती दिली. अनलॉकमुळे करोना बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडला आहे.

करोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. रुग्ण संख्या वाढल्यामुळे त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यावी. देण्यात येणारा निधी कमी पडत असून या निधीत वाढ करावी व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास अद्ययावत रुग्णवाहिका मिळावी आदी मागण्या केल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com