भाजपाला भंगारचे गोडाऊन बनवू नका - विजय वहाडणे

भाजपाला भंगारचे गोडाऊन बनवू नका - विजय वहाडणे
विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपाची (BJP) इमारत उभी केली आहे. या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे (Scrap godown) करू नका. इतर पक्षातून नेते आयात (Import) करता येतील पण प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते मात्र दुरावतील याचे भान ठेवा, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष विजय वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) भारतीय जनता पक्ष (BJP) खेड्यापाड्यात, सर्वसामान्य जनतेत पोहचविण्यासाठी स्व. उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत, रामभाऊ म्हाळगी, हशू अडवाणी, सूर्यभान वहाडणे, राम नाईक, राम कापसे, गंगाधर फडणवीस, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, डॉ. लेले, भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच अनेकांना सत्ता मिळून काम करण्याची संधी मिळाली. राज्यात-देशात सत्ताही मिळाली. कालच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी (BJP state vice president) काँग्रेसमधून (Congress) आलेले, भ्रष्टाचाराच्या अनेक चौकशा चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह (Former Minister Kripashankar Singh) यांची नेमणूक करण्यात आली.

मते मिळविण्यासाठी इतका बेशरमपणा करण्याचे धाडस कोण व कशामुळे करत आहे? रा. स्व. संघातून भाजपात (BJP) आलेले अनेक प्रामाणिक, ध्येयवादी कार्यकर्त्यांना डावलून पक्षात मनमानी सुरू आहे. मतांचे राजकारण (Political) फक्त आपल्यालाच कळते असे काही नेत्यांना वाटत असेल. मी एक लहान कार्यकर्ता असूनही असे सांगू इच्छितो, काहीही करून मतेच मिळवायची असतील तर मुस्लिम (Muslim) मते मिळविण्यासाठी दाऊद इब्राहिमलाही (Daut Ibrahim) पक्षात घ्यायला काय हरकत आहे. आदर्श व्यक्तिमत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्वच्छ प्रतिमा व रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची साथ असताना बाहेरून उसने आणण्याची गरज काय? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेकडे कोपरगाव शहराच्या विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून 3 वेळा प्रस्ताव दिले.

पण एका ढबूचीही मदत मिळाली नाही. आयारामांच्या नादी लागून इतिहास विसरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना चौकीदार चोर है असे अनेकदा बोलले गेले तेव्हा भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील बडे नेते का काही बोलले नाहीत? स्वतः शेपूट घालून बसायचे व ना. नारायण राणे (Narayan Rane) यांना बोलायला लावायचे हे योग्य नाही, असेही वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com