अफगणिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात निषेध का नाही? - वहाडणे
विजय वहाडणे

अफगणिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात निषेध का नाही? - वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

या आधी जगात कुठेही मुस्लिमांवर अन्याय (Injustice on Muslims) झाला, कुणी विटंबना अवमान केला तर भारतात निषेध व्हायचा (There used to be protests in India). पण या सध्या अफगाणिस्तानात (Afghanistan) मुस्लिम मुली, महिला भगिनी, बालके यांच्यावर अन्याय-अत्याचार हत्त्या (Injustice-murder) होत असूनही कुणीही निषेध-विरोध का करत नाही असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) यांनी केला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) म्हणाले, टिव्हीवर आपण बघतोय मुस्लिम महिला बालकांचा आक्रोश (The outcry of Muslim women and children) हा आक्रोश ऐकूनही सर्व समाजातील, पक्षातील नेते आज का बोलत नाहीत की जाणीवपूर्वक दुर्लक्ष (Ignore) चालू आहे. आपण आजच सावध झालो नाही तर हे तालिबानी भारतातही घुसून हत्याकांड करून देशातील हिंदू मुस्लिम (Hindu Muslim) एकजुटीवर घाला घालू शकतात. हिंदू महिलांवर अन्याय झाल्यावर मी बोलायचे व मुस्लिम महिलांवर अन्याय होत असताना बोलायचे नाही हे मला जमणार नाही.

सर्व पक्ष व नेत्यांनी यावर बोलले पाहिजे. मी जे बोलतो ते चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध तोंडावर गोड बोलणारा मी नाही. मागे कोपरगावात (Kopargav) मुस्लिम महिलांवर (Muslim Women) अन्याय झाला तेव्हा बोलणाराही मीच होतो. कुणी बोलत नाही म्हणून आपणही शांत बसा हे योग्य नाही. देशप्रेमी हिंदू व देशप्रेमी मुस्लिम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण गद्दारही अनेक आहेत. त्यामुळेच काश्मीरमध्ये (Kashmir) भारतीयांचे बळी जात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com