कोपरगाव बाजार समितीवरील प्रशासक नियुक्ती रद्द

कोपरगाव बाजार समितीवरील प्रशासक नियुक्ती रद्द
File Photo

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाचा 5 वर्षांचा कालावधी ऑक्टोबर 2020 मध्ये संपल्याने शासनाच्या आदेशानुसार

बाजार समितीवर सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. बाजार समितीवरील प्रशासक नियुक्ती विरूध्द बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व संचालक मंडळ यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले होते. या याचिकेचा निकाल लागला असून न्यायालयाने प्रशासक नियुक्ती रद्द केली असून बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाच्या हाती सोपविण्याचे आदेश दिले आहेत.

बाजार समितीस निकालपत्र प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर व प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव यांनी निकालाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्या आदेशाचे पालन करून प्रशासक एन.जी. ठोंबळ यांनी सोमवारी सकाळी बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे व संचालक मंडळाकडे दिला. त्यांनी तो पदभार स्विकारला आहे, अशी माहिती उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com