कोपरगावमध्ये 67 हजार रुपयांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कोपरगावमध्ये 67 हजार रुपयांचा गुटखा जप्त
File Photo

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरातील सप्तशृंगी मंदिरा जवळ खडकी (Khadaki) परीसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) यांनी टाकलेल्या छाप्यात सचिन विजय कटाळे याच्याकडे विक्रीसाठी आसलेल्या 67 हजार रूपयांचा हिरा व गोवा गुटखा जप्त (Gutkha Seized) करण्यात आला असून अरोपी कटाळे यांला अटक (Arrested) करण्यात आली.

महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीवर प्रतिबंध (Prohibition on Sale of Gutkha) असताना शरीरास हानिकारक असणार्‍या सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याची विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज रोसपणे केली जात होती. याची खबर मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस नाईक सचिन अडबल, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट, राहुल सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत जाधव, पोलीस नाईक रामकृष्ण खारतोडे, पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे यांनी केली आहे.

आरोपी सचिन विजय कटाळे याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा माल शेरखान पठाण राहणार कोपरगाव याच्याकडून विकत घेतला असल्याची कबुली दिली. शेरखान पठाण रेड पडल्याची माहिती मिळताच फरार झाला आहे. आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम 188 , 272 , 273,328 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com