कोपरगाव तालुक्यात 83 हजार 644 लोकांनी घेतला कोवीड लसीचा पहिला डोस

कोपरगाव तालुक्यात 83 हजार 644 लोकांनी घेतला कोवीड लसीचा पहिला डोस

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव (Kopargav) तालुक्यात आजपर्यंत 83 हजार 644 नागरिकांनी लसीचा पहीला डोस (first dose of the vaccine) घेतला असून दुसरा डोस (Second Dose) घेणारांची संख्या 35 हजार 328 आहे. सध्या लसीची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असून ज्यांनी अजून लस घेतली नाही त्यांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी केले आहे.

तालुक्यात आता 146 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. तर 52 गावांत एकही रुग्ण नाही. चालू आठवड्यामध्ये तालुक्यात उच्यांकी कोविड लस प्राप्त झाली होती. 7 व 8 सप्टेंबरला 11 हजार 500 लस (Vaccine) मिळाली व दोन दिवसात 11 हजार लसीकरण झाले आहे. 9 तारखेला 2 हजार 700 लसीकरण झाले तर 11 तारखेला 6 हजार लसीकरण करण्यात आले आहे. चालू आठवड्यात 22 हजार लसीकरण झाले आहे.

तालुक्यातील 3 लाख 7 हजार लोकसंख्येमध्ये 18 अधिक वयाचे लसीकरण लाभर्थ्यांची संख्या 1 लाख 84 हजार 200आहेत पैकी पहीला डोस घेतलेल्यांची 83 हजार 644 संख्या आहे. अजूनही जवळपास एक लाख लसीकरण होणे बाकी आहे. आता लस पुरवठा वाढलेला आहे. तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. घोलप यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com