
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव उपकारागृहात विविध गुन्ह्यांत बंद असलेल्या चार आरोपींनी कारागृहाची भिंत फोडून त्यातून पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
अनिल ज्ञानदेव शिंदे राहाता, नारायण रामप्रसाद बसनेत नाशिक, किरण उर्फ अंथोनी छगन सोनवणे रा.नाशिक , विकी विष्णू चावरे रा.राहाता हे आरोपी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत जुने उपकारागृहात आहेत. या आरोपींनी मंगळवार दि. 12 ऑगष्ट रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास पाच क्रमांकाच्या बाराक मध्ये असताना शौचालयाच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला काही हत्यारांनी छिद्र पाडून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र ही बाब तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं .465/2020 भा.दं.वि.कलम 224,427,120 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे करीत आहेत.दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.