कोपरगावमध्ये गायी चोरून विकणार्‍यांची टोळी सक्रीय

कोपरगावमध्ये गायी चोरून विकणार्‍यांची टोळी सक्रीय

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरात एक गायी पळवणारी टोळी कार्यरत असून ही टोळी शहरातील गायींसह गुजरात येथून आलेल्या गोरक्षकांच्या गायी पळवून

त्या नजिकच्या बाजारात नेऊन खाटकांना विकत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे त्यातून गोळा केलेली माया खासगी सावकारीसाठी वापरत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही टोळी एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन गोवंश अत्या बंदीचा कायदा लागू केला आहे. कोपरगावात मात्र विपरीत घडताना दिसत आहे.

एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित दुय्यम दर्जाच्या एका पदाधिकार्‍यांचा भाऊच यात गुंतला असून त्याने काठेवाडी गोपालांच्या गायीवर वक्र दृष्टी ठेऊन त्या गायी पळविण्याचा सपाटा लावला आहे. वाहनातून पळवलेल्या गायी वैजापूर, येवला व तत्सम बाजारात जाऊन त्या गोवंश कत्तल करणार्‍यांना विकल्या जात आहे.

नवीन औद्योगिक वसाहतीजवळ ही बाब उघड झाली असून एका छोट्या टेम्पोत हे काठियावाड गुराखी आपल्या गायी मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन येत असताना एक जखमी असलेली व त्यामुळे मागे राहिलेली गाय ही टोळी एक टेम्पो घेऊन पळविण्यासाठी आली.

त्यांनी ती टेम्पोत घातली असता. ही खबर या गो नेत्यास लागली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही उतरून घेतली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. गावातील बर्‍याच गायी गायब झाल्या असून या मागेही ही टोळी कार्यरत असल्याचे बोलले जाते.

गोपालकाने या बाबत पोलीसात तक्रार देऊन पाहिली. मात्र शहरातील एका संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍याने यात सहभाग घेऊन, आमचा माणूस असा काही करणार नाही. गैरसमज झाला असल्याचा बहाणा करून या पदाधिकार्‍यांच्या भावास अभय दिले.

त्यांनी गोपालकावर दबाव आणून लेखी केलेली तक्रार मागे घ्यायला लावली आहे. या प्रश्नी पोलिसानी या बाबत चौकशी करून खर्‍या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षक समितीने केली आहे. एका पोलीस कर्मचार्‍याने या घटनेस दुजोरा दिला असून अशी घटना काही दिवसापूर्वी घडली होती. मात्र त्यांनी आपापसात मिटवून घेतली असल्याचे त्याने सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com