कोपरगावात कोव्हीड हॉस्पिटल सुरू करावे : माजी नगराध्यक्ष पाटील

कोपरगावात कोव्हीड हॉस्पिटल सुरू करावे : माजी नगराध्यक्ष पाटील

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना या जीवघेण्या रोगावर आजारावर आजून लस आली नाही. करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. शहरातील खाजगी डॉक्टर जीव धोक्यात घालून रूग्ण सेवा करत आहे.

इतर तालुक्याचा विचार करता कोपरगावत खाजगी आद्यवत करोना हॉस्पिटल नाही.त्यामुळे कोपरगावातील खाजगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांनी एकत्र येत एक सुसज्ज करोना हॉस्पिटल उभारावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज करोना रूग्णांना असते. जे लोक पैसे देऊ शकतात त्यांना ईथे उपचार घेता येईल. त्यामुळे गोरगरीब, सामान्य लोकांसाठी एस.एस.जी.एम कॉलेज येथे जे कोविड सेन्टर आज आहे त्याच्यावर लोड येणार नाही, तिथेही जास्त प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे. त्यामुळे लोकांमधली भीती कमी होऊन लवकर रुग्ण संख्या आटोक्यात येईल आणि कोणी पेशंट दगावणार नाही.

यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून कोपरगाव शहरात कोविड अद्यवत सेंटर सुरू करता येईल याची माहिती तातडीने घ्यावी आणि डॉक्टर्स यांना विनंती करून यासाठी सहकार्य करावे. या विषयाची चर्चा सर्वे शहरात, ग्रामीण भागात, गल्ली बोळात चालू आहे.

जर कोणी पेशंट सिरीयस झाले आणि त्या पेशंटला मोठ्या शहरात हलवायची वेळ आली तर शहरातले बहुतांशी हॉस्पिटल फुल्ल आहेत.त्यामुळे बेड न मिळाल्याने अनेक रूग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुहे कोपरगाव शहरातील डॉक्टरांनी एकत्र येत कोपरगावच्या जनतेच्या हितासाठी सर्व सुहिवधा युक्त एक कोव्हीड हॉस्पिटल सुरू करावे असे आवाहन मंगेश पाटील यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com