कोपरगावात 117 करोना रुग्णांची भर

कोपरगावात 117 करोना रुग्णांची भर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 19 मे रोजी सापडलेल्या 68 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 70 तर खासगी लॅब मधील 15 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 32 असे 117 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 117 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात कोपरगाव शहर येथील 1, वडांगळे वस्ती येथील 1, इंदिरानगर येथील 4, स्टेशन रोड येथील 1,गांधीनगर येथील 2, गांधी चौक येथील 2, सुभद्रानगर येथील 1, ओमनगर येथील 1, खडकी येथील 3, अन्नपूर्णानगर येथील 1, सप्तर्षी मळा येथील 1, गजानन नगर येथील 1, श्रीरामनगर येथील 1, लक्ष्मी नगर येथील 1, मंगलमूर्ती टॉवर येथील 1, इंदिरापथ येथील 1 तर ग्रामीण मधील कासली येथील 6, कोळपेवाडी येथील 7, खिर्डीगणेश येथील 2, चांदगव्हाण येथील 1, माहेगाव येथील 1, सुरेगाव येथील 1, जेऊर कुंभारी येथील 5, पढेगाव येथील 1, कान्हेगाव येथील 7, सडे येथील 2, ब्राम्हणगाव येथील 3, कारवाडी येथील 4, वडगाव येथील 1, सांगवी भुसार येथील 1, हांडेवाडी येथील 1, बक्तरपूर येथील 2, शिंगणापूर येथील 4, दशरथवाडी येथील 1, घोयगाव येथील 1, धामोरी येथील 1, जवळके येथील 1, संजीवनी येथील 1, रेल्वे स्टेशन येथील 1, निमगाव येथील 1, टाकळी येथील 1, मूर्शतपूर येथील 1, चासनळी येथील 1, रवंदे येथील 1, करंजी येथील 3, पोहेगाव येथील 6, हिंगणी येथील 1, शहापूर येथील 1, काकडी येथील 1, सोनेवाडी येथील 2, मढी येथील 3, चांदेकसारे येथील 5, कोळगाव येथील 5, कुंभारी येथील 2, साकरवाडी येथील 1 असे 117 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 20 मे पर्यंत 11 हजार 443 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 10 हजार 438 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 827 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. आजपर्यंत एकूण 51 हजार 782 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 22.10 आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के आहे. आतापर्यंत 178 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com