कोपरगावात सहा करोना संक्रमित रुग्ण

कोपरगावात सहा करोना संक्रमित रुग्ण

कोपरगाव|तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 8 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 18 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 34 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली यात 4 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत.तर नगर येथे पाठवलेल्या 11 व्यक्तींच्या स्रावांपैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात 6 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

25 रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण 34 अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात 4 रुग्ण बाधित आढळले.

त्यात पढेगाव येथील 60 वर्षीय पुरुष तर अंचलगाव येथील 46 वर्षीय पुरुष तर कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील 29 वर्षीय पुरुष, जाणकीविश्व येथील 64 वर्षीय पुरुष बाधित आढळले आहेत. नगर येथे 11 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील दत्तनगर येथील 34 वर्षीय पुरुष तर भामानगर येथील 33 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

25 करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यांना दुपारी घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात 9 ऑगष्टपर्यंत 334 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 169 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. 1 हजार 979 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

तर 161 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. करोनावर मात करणार्‍यांचे प्रमाण 48.20 टक्के आहे.करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची संख्या 16.57 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के असे आहे. 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com