बुधवारी कोपरगावात 68 करोना रूग्णांची भरः एकाचा मृत्यू

बुधवारी कोपरगावात 68 करोना रूग्णांची भरः एकाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 18 मे रोजी सापडलेल्या 114 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 49 तर खासगी लॅब मधील 19 असे 68 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 68 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.

त्यात खडकी येथील 1,येवला रोड येथील 1,गजानन नगर येथील 4,निवारा येथील 3,ओम नगर येथील 4,गवारे नगर येथील 1,श्रद्धा नगर येथील 1,फडके हॉस्पिटल जवळ येथील 1,लक्ष्मी नगर येथील 1,इंदिरा पथ येथील 2,कोर्ट रोड येथील 4,छ. संभाजी चौक येथील 1 ,विवेकानंद नगर येथील 1 तर ग्रामीण मधील माहेगाव देशमुख येथील 1, दहिगाव येथील 2, टाकळी येथील 1, करंजी येथील 3, सांगवी भुसार येथील 1, जे. कुंभारी येथील 2, सुरेगाव येथील 2, वारी येथील 7, मढी येथील 2,सोनेवाडी येथील 2, शहापूर येथील 2, टाकळी येथील 2, घारी येथील 1, चांदेकसारे येथील 1, कोकमठाण येथील 1, ब्राम्हणगाव येथील 1, रवंदे येथील 2, कासली येथील 1, शिरसगाव येथील 1, शिंगणापूर येथील 2, स्टेशन रोड येथील 1 असे 68 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 19 मे पर्यंत अकरा हजार 326 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दहा हजार 310 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 838 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. तर आज पर्यंत 50 हजार 790 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.30 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.57 टक्के असे आहे. तर 178 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com