कोपरगाव नवीन 19 जण पॉझिटीव्ह

कोपरगाव नवीन 19 जण पॉझिटीव्ह
COVID-19

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 14 जून रोजी सापडलेल्या 20 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 17 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 2 असे एकूण 19 अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल एका दिवसात एकूण 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात इंगळेनगर येथील 1, साईनगर 1, दत्तनगर 1, कोपरगाव येथील 1, जिजामाता चौक 1 तर ग्रामीणमधील धोत्रे येथील 1, वडगाव 1, पोहेगाव 9, सोनेवाडी 2, कान्हेगाव 1 असे 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 15 जूनपर्यंत एकून बारा हजार 275 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून अकरा हजार 821 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 253 अ‍ॅक्टिव पेशंट आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com