कोपरगाव तालुक्यात केवळ चार रुग्ण

मात्र करोना मृत्यूचा आकडा दोनशे पार
कोपरगाव तालुक्यात केवळ चार रुग्ण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 12 जून रोजी सापडलेल्या 27 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली, त्यात 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शहरात एक रुग्ण तर 3 रुग्ण ग्रामीण भागात आहे. मात्र आजपर्यंत 201 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील शारदा नगर येथील एक 26 वर्षीय महिला तर ग्रामीण मधील मंजूर येथील 45 वर्षीय पुरुष तर 42 वर्षीय महिला, पोहेगाव येथील 18 वर्षीय पुरुष असे 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 13 जून पर्यंत 12 हजार 236 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 11 हजार 633 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 402 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 77 हजार 394 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 15.81 आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.64 टक्के आहे. आतापर्यंत 201 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com