कोपरगावात 152 नवीन करोना संक्रमित रूग्णः एकाचा मृत्यू

कोपरगावात 152 नवीन करोना संक्रमित रूग्णः एकाचा मृत्यू
corona

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 2 मे रोजी सापडलेल्या 80 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 114 तर खासगी लॅब मधील 10 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 28 असे 152 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर डाऊच येथील 67 वर्षीय एका पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 152 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात 3 मे पर्यंत 9 हजार 207 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 8 हजार 995 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1054 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 32 हजार 455 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. तालुक्यात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची संख्या 22.08 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के आहे. तर 131 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com