कोपरगावात करोनाने चौघांचा मृत्यू

बळींची संख्या पोहचली 126 वर; दिवसभरात सापडले 153 करोना बाधीत
कोपरगावात करोनाने चौघांचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 27 एप्रिल रोजी सापडलेल्या 196 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 87 तर खासगी लॅब मधील 34 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 32 असे एकूण 153 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर सुरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, धामोरी येथील 47 वर्षीय पुरुष, कान्हेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, साईधाम येथील 65 वर्षीय पुरुष या चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 153 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 9, स्वामी समर्थ नगर येथील 5, खडकी येथील 3, भाजी मार्केट जवळ येथील 3, गांधीचौक येथील 2, रिद्धी सिद्धीनगर येथील 2, लक्ष्मीनगर येथील 2, बँक रोड येथील 2, गोदाम गल्ली येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, कोर्ट रोड येथील 1, हनुमान नगर येथील 1, कालेमळा येथील 1, शिवाजी नगर येथील 1, द्वारकानगरी येथील 1, शिवाजी रोड येथील 1, ओम नगर येथील 1, येवला रोड येथील 1, पांडे गल्ली येथील 1 तर ग्रामीण मधील ब्राम्हणगाव येथील 15, टाकळी येथील 11, येसगाव येथील 5, चासनळी येथील 5, शहाजापूर येथील 5, बक्तरपूर येथील 5, करंजी येथील 4, कोळपेवाडी येथील 4, चांदेकसारे येथील 4, भोजडे येथील 4, मळेगाव थडी येथील 4, मंजूर येथील 3, जे. पाटोदा येथील 3, सुरेगाव येथील 3, कारवाडी येथील 3, मूर्शतपूर येथील 3, माहेगाव देशमुख येथील 3, पढेगाव येथील 3, गोधेगाव येथील 2, वारी येथील 2, अंचलगाव येथील 2, रवंदे येथील 2, कोळगाव थडी येथील 2, कोकमठाण येथील 1, खोपडी येथील 1, सावळगाव येथील 1, शिंगणापूर येथील 1, दशरथवाडी येथील 1, शहा पांचाळे येथील 1, मढी येथील 1, सांगावी भुसार येथील 1, संजीवनी येथील 1, पोहेगाव येथील 1, सडे येथील 1 असे दिवसभरात एकूण 153 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. कोपरगाव तालुक्यात 28 एप्रिल पर्यंत 8 हजार 534 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 6 हजार 409 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1097 अ‍ॅक्टिव रुग्ण आहे तर आजपर्यंत 31 हजार 782 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. 126 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com