कोपरगावात 64 करोना रुग्णांची भर

कोपरगावात 64 करोना रुग्णांची भर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 16 मे रोजी सापडलेल्या 80 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 47 तर खासगी लॅब मधील 5 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 12 असे एकूण 64 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर शहरातील 69 वर्षीय महिला व 59 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील चांदेकसारे येथील 85 वर्षीय पुरुष, पढेगाव येथील 35 वर्षीय पुरुष अशा चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 64 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात गजानननगर येथील 6,निवारा येथील 6, लक्ष्मीनगर येथील 2, शंकरनगर येथील 2, ओमनगर येथील 2, श्रद्धानगरी येथील 2, कोपरगाव येथील 1, गवारेनगर येथील 1, लिंबारा मैदान येथील 1, टिळकनगर येथील 1, श्रद्धा कॉम्प्लेक्स येथील 1, सुभाषनगर येथील 1 तर ग्रामीण मधील कुंभारी येथील 1 धारणगाव येथील 1, जे. कुंभारी येथील 1, तिळवणी येथील 1, नवले वस्ती येथील 1, सा. विहीर येथील 2, कोकमठाण येथील 1, सां. भुसार येथील 1, वेळापूर येथील 3, सुरेगाव येथील 1, ब्राम्हणगाव येथील 1, वारी येथील 3, तळेगाव येथील 1, दहिगाव येथील 1, धोत्रे येथील 1, हिंगणी येथील 2, चांदेकसारे येथील 2, पोहेगाव येथील 2, कोळपेवाडी येथील 1, बहादरपुर येथील 1, शहापूर येथील 1, संजीवनी येथील 1, रवंदे येथील 1, कुंभारी येथील 1, शिंगणापूर येथील 1 असे 64 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 17 मे पर्यंत एकूण 11 हजार 134 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दहा हजार 98 रुग्ण बरे झाले आहे.तसेच 878 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आजपर्यंत एकूण 47 हजार 899 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 23.14 आहे. मृत्यूचे प्रमाण 1.52 टक्के आहे.तर 172 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com