कोपरगावात 103 करोना रुग्णांची भरः एकाचा मृत्यू

कोपरगावात 103 करोना रुग्णांची भरः एकाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 3 मे रोजी सापडलेल्या 152 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 87 तर खासगी लॅब मधील 13, अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 3 असे 103 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर शहरातील लक्ष्मी नगर येथील 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 103 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 8, मोहिनीराज नगर येथील 5, गोरोबा नगर येथील 1, निवारा येथील 2, गजानन नगर येथील 1, खडकी येथील 5, भाजी मार्केट येथील 1, शारदा नगर येथील 2, महादेव नगर येथील 1, साईनगर येथील 2, जगदंबा नगर येथील 1, मारुती मंदिर जवळ येथील 1 तर ग्रामीण मधील धारणगाव येथील 2, शिंगणापूर येथील 2, टाकळी येथील 14, येसगाव येथील 3, कोळपेवाडी येथील 2, तीनचारी येथील 1, कोळगाव थडी येथील 1, कासली येथील 1, कोकमठाण येथील 3, पढेगाव येथील 2, संवत्सर येथील 1, धामोरी येथील 2, करंजी येथील 6, दहेगाव येथील 1, चांदेकसारे येथील 1, शिरसगाव येथील 1, मूर्शतपूर येथील 2, ब्राम्हणगाव येथील 6, रवंदे येथील 4, आंचलगाव येथील 2, वारी येथील 6, मायगाव देवी येथील 1, चासनळी येथील 3, वेळापूर येथील 1, मंजूर येथील 1, निमगाव मढी येथील 1, देर्डे कोर्‍हाळे येथील 1 असे दिवसभरात एकूण 103 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 4 मे पर्यंत 9 हजार 310 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 8 हजार 191 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 961 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 32 हजार 558 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 132 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com