कोपरगावात करोना नियम ढाब्यावर

भाजीपाला खरेदीसाठी भरला बाजार
कोपरगावात करोना नियम ढाब्यावर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगावात करोनाने शेकडो नागरीकांचा मृत्यु झाला असून हजारो जनांना कोनाची लागण झाली आहे. मात्र अद्यापही नागरीकांना शहाणपण आल्याचे दिसत नाही. सोमवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरीकांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी एवठी होती की याला बाजाराचे स्वरूप आले होते. या गर्दीपुढे पोलिस प्रशासनही हातबल ठरले.

वैश्विक महामारी ठरलेल्या करोनाने सर्वत्र कहर केला आहे. कोणतेही गाव अथवा खेडे किंवा उपनगर नाही की तेथे करोना पोहचला नाही. सध्या सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून सुरवातीला दवाखान्यात बेड चा तुटवाडा, बेड मिळाले तर औषधंचा तुटवाडा, आणि त्यानंतर ऑक्सिजन चा तुटवाडा इतकी भयानक अवस्था सर्वत्र झाली आहे. मात्र अजून देखील कोपरगाव येथील सुजाण नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येते आहे. आज सोमवार रोजी शहरातील भाजीपाला खरेदी करण्याकरिता इतकी गर्दी केली होती की या गर्दीत कोरोनाचा देखील गुदमरून मृत्यू होईल असे आश्चर्याने नागरिक म्हणत आहे.

सध्या राज्य शासनाने 1 मे पर्यंत लॉक डाऊन लावला आहे. त्यात अत्यावशक सेवा वगळण्यात आल्या आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये हा शासनाचा शुद्ध हेतू मात्र नागरिक त्याचा गैरफायदा घेत आहे. या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलवायस पाहिजे मात्र तसे दिसून येत नाही. याचा गंभीर परिणाम रुग्णच्या संख्येत वाढ झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

शनिवार- रविवारी संचार बंदी संपल्यानंतर काही बेजबाबदार नागरिकांनी गुरुद्वारा रोडला भान सोडून गर्दी केली होती. रोज 7-8 अंत्यसंस्कार स्मशानभूमीत नगर पालिका कर्मचारी करत असून तरी काही नागरिक गलथान पणा करत गर्दी करत आहे. नागरिकांना आवाहन आहे त्यांनी गर्दी करू नये. गर्दी कमी व्हावी यासाठी पोलिसांना ही आवाहन आहे की त्यांनी गर्दी नियंत्रण आणण्यासाठी बळाचा वापर करावा व नगर पालिका कर्मचारी देखील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - विजय वहाडणे, नगराध्यक्ष.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com