सोमवारी कोपरगावात 28 रूग्ण करोना पॉझिटिव्ह

कोळगाव थडी येथील महिलेचा मृत्यु
सोमवारी कोपरगावात 28 रूग्ण करोना पॉझिटिव्ह
Corona

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 25 एप्रिल रोजी सापडलेल्या 73 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 16 तर खासगी लॅब मधील 12 असे 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर तालुक्यातील कोळगाव थडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 28 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 1, ओमनगर येथील 1, शारदा नगर येथील 1, ब्राम्हणगल्ली येथील 1, तर ग्रामीण मधील संवत्सर येथील 3, कोकमठाण येथील 4, लक्ष्मण वाडी येथील 1, नाटेगाव येथील 1, रामवाडी येथील 1, कान्हेगाव येथील 5, चासनळी येथील 1, डाऊच येथील 2, करंजी येथील 1, पोहेगाव येथील 2, चांदेकसारे येथील 1, वेस येथील 1, सोनेवाडी येथील 1 असे आज दिवसात एकूण 28 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 26 एप्रिल पर्यंत 8 हजार 185 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 6 हजार 120 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1037 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 31 हजार 433 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 116 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com