कोपरगाव तालुक्यात 20 करोनाबाधित

करोना
करोना

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 30 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 29 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 124 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 20 रुग्ण करोना बाधित आढळून आले असून 104 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. तसेच काल 19 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 20 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 1, जुना पोष्ट येथील 1, गुलमोहोर कॉलनी येथील 1, छ. संभाजी चौक येथील 2, महादेवनगर येथील 1, धारणगाव रोड येथील 1, निवारा येथील 1, तर ग्रामीणमधील माहेगाव देशमुख येथील 4, वेळापूर येथील 5, कोळपेवाडी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, अंजनापूर येथील 1 असे काल दिवसभरात एकूण 20 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

19 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात काल 1 ऑक्टोबरपर्यंत एकूण 1 हजार 856 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 130 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तसेच एक हजार 693 रुग्ण बरे झाले आहे. आजपर्यंत एकूण 8 हजार 757 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 21.19 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.77 टक्के असे आहे. तर 33 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com