कोपरगावमध्ये नव्याने 20 करोना बाधित

कोपरगावमध्ये नव्याने 20 करोना बाधित

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 3 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 25 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 54 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

या अहवालांपैकी शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी 11 रुग्ण तर अहमदनगर येथे पाठवलेल्या 57 स्राव पैकी 6 रुग्ण तर खासगी लॅबमधील 3 करोना बाधित रुग्ण सापडले आहे. असे काल दिवसभरात एकूण 20 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 94 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 17 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

काल पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील छ. शिवाजी रोड येथील एक 72 वर्षीय पुरुष, छ . शिवाजी नगर येथील एक 48 वर्षीय महिला, धारणगाव रोड येथील 35 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष,लक्ष्मी नगर येथील एक 50 वर्षीय पुरुष, गोदाम गल्ली येथील एक 35 वर्षीय पुरुष,जैन मंदिर येथील एक 13 वर्षीय युवक,टाकळी नाका येथील एक 45 वर्षीय महिला,

भगवती माता कॉलनी येथील एक 58 वर्षीय पुरुष, श्रद्धा नगरी येथील एक 6 वर्षीय मुलगी, सुरेगाव येथील एक 12 वर्षीय मुलगी तर अहमदनगर येथे पाठवलेल्या स्राव मधील दत्तनगर येथील एक 18 वर्षीय महिला, टिळकनगरमधील 21 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, छ. शिवाजीनगर मधील 63 वर्षीय पुरुष, गांधीनगर मधील 40 वर्षीय महिला तर 20 वर्षीय पुरुष व खासगी लॅबमधील वाणी सोसायटी येथील 72 वर्षीय पुरुष व 46 वर्षीय महिला, धरणगाव रोड येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात काल 4 सप्टेंबरपर्यंत एकूण 970 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 162 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह तर 790 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 4 हजार 393 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com