कोपरगावात नवीन 8 करोना बाधित
सार्वमत

कोपरगावात नवीन 8 करोना बाधित

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरासह तालुक्यात 9 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 6 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 32 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या अहवालांपैकी सोमवारी 8 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. 21 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

काल आढळलेल्या करोना बाधित रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील 34 वर्षीय पुरुष, इंदिरा पथ येथील 48 वर्षीय महिला, गांधीनगर मधील 20 वर्षीय युवक, तालुक्यातील अंचलगाव येथील 18 व 20 वर्षीय युवक तर 50 वर्षीय महिला, पोहेगाव येथील 25 वर्षीय युवक, झगडे फाटा येथील 19 वर्षीय महिला आदींचा यामध्ये समावेश आहे.

तर 21 करोना बाधित रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 8 जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठवले आहे. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे. कोपरगाव तालुक्यात 342 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 156 रुग्ण अ‍ॅॅक्टिव्ह आहेत तर आजपर्यंत एकूण 2 हजार 51 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com