कोपरगावात 105 नवीन करोनाबाधित, एकाचा मृत्यू

कोपरगावात 105 नवीन करोनाबाधित, एकाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 14 मे रोजी सापडलेल्या 128 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 81 तर खासगी लॅब मधील 14 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 10 असे 105 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर तालुक्यातील मंजूर येथील 40 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल एका दिवसभरात एकूण 105 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवारा येथील 4, लक्ष्मीनगर येथील 3, गजानननगर येथील 3, गवारे नगर येथील 2, दत्तनगर येथील 2, शारदा नगर येथील 2, धारणगाव रोड येथील 1, बागुलवस्ती येथील 1, गोकुळनगरी येथील 1, खडकी येथील 1, समतानगर येथील 1, कोपरगाव येथील 1, भगवती कॉलनी येथील 1 तर ग्रामीण मधील धामोरी येथील 6, पढेगाव येथील 6, सोनेवाडी येथील 5, वेळापूर येथील 4, शिंगणापूर येथील 4, येसगाव येथील 4, चांदेकसारे येथील 3, जेऊर कुंभारी येथील 3, कोकमठाण येथील 3, ब्राम्हणगाव येथील 3, करंजी येथील 3, दहिगाव येथील 3, घोयगाव येथील 3, संवत्सर येथील 3, सावळीविहीर येथील 2, घारी येथील 2, काकडी येथील 2, पिंपळवाडी येथील 2, कोळपेवाडी येथील 1, हिंगणी येथील 1, वारी येथील 1, कोळगाव थडी येथील 1, रांजणगाव देशमुख येथील 1, पोहेगाव येथील 1, जवळके येथील 1, मढी येथील 1, सोनारी येथील 1, रवंदे येथील 1, सावळगाव येथील 1, धोत्रे येथील 1, कान्हेगाव येथील 1, सुरेगाव येथील 1, कासली येथील 1, गोधेगाव येथील 1, आपेगाव येथील 1 असे 105 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

कोपरगाव तालुक्यात दि. 15 मे पर्यंत दहा हजार 987 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून नऊ हजार 730 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1092 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे तर आजपर्यंत एकूण 45 हजार 783 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 23.82 तर मृत्यूचे प्रमाण 1.52 टक्के आहे. आतापर्यंत 166 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com