सोमवारी कोपरगावात 162 करोना पॉझिटिव्हः एकाचा मृत्यू

सोमवारी कोपरगावात 162 करोना पॉझिटिव्हः एकाचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 11 एप्रिल रोजी सापडलेल्या 115 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 149 तर खासगी लॅब मधील 13 असे एकूण 162 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 162 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 8, शारदानगर येथील 2, सुभद्रा नगर येथील 1, स्वामी समर्थ नगर येथील 2, मोहिनीराज नगर येथील 1, धारणगाव रोड येथील 2, इंदिरा पथ येथील 1, मोतीराज नगर येथील 2, शिवाजी रोड येथील 1, विवेकानंद नगर येथील 1, बागुल वस्ती येथील 1, कहार गल्ली येथील 1, काले मळा येथील 3, गवारे नगर येथील 1, गांधी नगर येथील 2, श्रीराम कॉलनी येथील 2, रिद्धी सिद्धी नगर येथील 1, समता नगर येथील 1 लक्ष्मी नगर येथील 1 तर ग्रामीण रुग्ण मधील रवंदे येथील 12, टाकळी येथील 13, डाऊच बु. येथील 2, जेऊर पाटोदा येथील 2, सुरेगाव येथील 4, शहापूर येथील 1, तीनचारी येथील 1, जवळके येथील 1, मूर्शतपूर येथील 2, संजीवनी येथील 1, माहेगाव देशमुख येथील 5, कोकमठाण येथील 5, वारी येथील 1, सडे येथील 1, कारवाडी येथील 2, हांडेवाडी येथील 1, चासनळी येथील 4, वेळापूर येथील 2, सांगवी भुसार येथील 6, शहाजापूर येथील 2, मंजूर येथील 1, धोत्रे येथील 3, खोपडी येथील 2, भोजडे येथील 1, मायगाव देवी येथील 2, धारणगाव येथील 2, ब्राम्हणगाव येथील 6, संवत्सर येथील 4, मढी बु. येथील 2, देर्डे कोर्‍हाळे येथील 1, पोहेगाव येथील 1, मनेगाव येथील 1, जेऊर कुंभारी येथील 1, लौकी येथील 5, कासली येथील 1, तळेगाव येथील 1, पढेगाव येथील 4, करंजी येथील 9, कोळपेवाडी येथील 1, देर्डे चांदवड येथील 1, सोनेवाडी येथील 1 असे 162 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

तालुक्यात आज 12 एप्रिलपर्यंत 6 हजार 258 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 5 हजार 131 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1041 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहे. आज पर्यंत 26 हजार 325 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 32.77 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.12 टक्के असे आहे. तर 69 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com