कोपरगाव : टाकळीतील वृध्दाचा करोनाने मृत्यू

कोपरगाव तालुक्यात नव्याने 68 रुग्ण बाधित
कोपरगाव : टाकळीतील वृध्दाचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 35 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 287 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 37 रुग्ण तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्यांपैकी 2 रुग्ण तसेच खासगी लॅब मधील 29 रुग्ण असे एकूण 68 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 53 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर टाकळी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 68 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील शिवाजी रोड येथील 1, समतानगर येथील 1, गजानन नगर येथील 3, रिद्धी सिद्दी नगर येथील 3, निवारा येथील 5, भामा नगर येथील 3, लक्ष्मी नगर येथील 1, सबजेल येथील 1, सुभद्रा नगर येथील 1, ओमनगर येथील 1, शंकर नगर येथील 1,तर ग्रामीण मधील जवळके येथील 1, साकारवाडी येथील 2,वारी येथील 1, उक्कडगाव येथील 1, शहाजापूर येथील 2, मंजूर येथील 1, मळेगाव थडी येथील 2, टाकळी येथील 6, नाटेगाव येथील 1, चांदेकसारे येथील 2, पोहेगाव येथील 2, सुरेगाव येथील 1, धामोरी येथील 10, मूर्शतपूर येथील 6, संजीवनी येथील 1, दहेगाव बोलका येथील 1, जेऊर पाटोदा येथील 4, कान्हेगाव येथील 3 असे आज दिवसभरात एकूण 68 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

तर 53 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.तर तालुक्यातील टाकळी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यात आज 22 सप्टेंबरपर्यंत एकूण1 हजार 616 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 204 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 383 रुग्ण बरे झाले आहे. आजपर्यंत एकूण 6 हजार 858 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 29 व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com