कोपरगाव : वारीच्या 60 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू

तालुक्यात दिवसभरात 16 रुग्ण करोनाबाधित
corona
corona

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 28 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 29 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 178 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 13 रुग्ण तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 1 तसेच खासगी लॅब मधील 2 रुग्ण असे एकूण 16 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 39 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर तालुक्यातील वारी येथील 60 वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 16 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील समतानगर येथील 1, मेन रोड येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, तर ग्रामीण मधील संजीवनी येथील 4, माहेगाव देशमुख येथील 4, वारी येथील 1, शिंगणापूर येथील 1, मूर्शतपूर येथील 1, मंजूर येथील 1, कासली येथील 1 असे काल दिवसभरात एकूण 16 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

तर 39 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात दि. 29 सप्टेंबरपर्यंत एक हजार 807 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 141 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 634 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत 8 हजार 361 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 21.61 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.77 टक्के असे आहे. तर 32 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com