कोपरगावात दिवसभरात 28 करोनासंक्रमित

कोपरगावात दिवसभरात 28 करोनासंक्रमित

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 26 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 33 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 168 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 20 रुग्ण तसेच खासगी लॅब मधील 8 रुग्ण असे एकूण 28 रुग्ण करोना बाधित आढळून आले. दिवसभरात 22 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 28 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 1, महादेव नगर येथील 1, अन्नपूर्णा नगर येथील 2, धारणगाव रोड येथील 1, साईधाम येथील 2, तर ग्रामीण भगातील शिंगणापूर येथील 2, वारी येथील 4, संजीवनी येथील 1,

माहेगाव देशमुख येथील 3, कोळपेवाडी येथील 1, जे. पाटोदा येथील 1, साकरवाडी येथील 1, सुरेगाव येथील 3, कुंभारी येथील 2, खोपडी येथील 1, बक्तरपूर येथील 1, शिंगवे येथील 1, धामोरी येथील 1 असे काल दिवसभरात एकूण 28 करोना बाधित आढळून आले आहेत. तर 22 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात दि. 27 सप्टेंबरपर्यंत एकूण एक हजार 762 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 158 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 564 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 7 हजार 976 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. 31 व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com