कोपरगाव तालुक्यात सहा जणांचा करोनाने दुदैवी मृत्यु

मंगळवारी दिवसभरात तालुक्यात सापडले 196 करोना पॉझिटिव्ह रूग्ण
कोपरगाव तालुक्यात सहा जणांचा करोनाने दुदैवी मृत्यु

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 26 एप्रिल रोजी सापडलेल्या 28 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 14 तर खासगी लॅब मधील 75 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 107 असे 196 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर कोपरगाव येथील 46 व 75 वर्षीय पुरुष, तर सवंत्सर येथील 76 वर्षीय पुरुष, स्वामी समर्थ नगर येथील 64 वर्षीय महिला, सुरेगाव येथील 58 वर्षीय पुरुष, जेऊर पाटोदा येथील 46 वर्षीय पुरुष या सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 196 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 1, सुभाषनगर येथील 1, खडकी येथील 4, टिळकनगर येथील 4, निवारा येथील 4, बैलबाजार रोड येथील 1, महावीर कॉलनी येथील 1, ब्रिजलाल नगर येथील 2, अन्नपूर्णा नगर येथील 2, शिवाजी रोड येथील 1, सुभद्रानगर येथील 3, गांधीनगर येथील 2, शारदा नगर येथील 2, गांधी चौक येथील 1, टाकळी फाटा येथील 1, गिरमे चाळ येथील 2, गजानन नगर येथील 5, गोरोबा नगर येथील 1, ओम नगर येथील 4, रिद्धी सिद्धी नगर येथील 2, गवारे नगर येथील 1, समता नगर येथील 1, आढाव वस्ती येथील 1, लक्ष्मी नगर येथील 3, गोदाम गल्ली येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, छ. शिवाजी रोड येथील 5, गोकुळ नगरी येथील 3, कालेमळा येथील 1, बोरावके बिल्डिंग येथील 1, शिंगी नगर येथील 2, बेट येथील 1, मराठी शाळेजवळ येथील 1, इंदिरा पथ येथील 1, समर्थ नगर येथील 1, अंबिका नगर येथील 1, सम्यक नगर येथील 1, तर ग्रामीण मधील रांजणगाव देशमुख येथील 1, करंजी येथील 2, संवत्सर येथील 5, दशरथवाडी येथील 4, शिंगणापूर येथील 1, जेऊर कुंभारी येथील 7, दहिगाव येथील 3, कोळगाव येथील 2, टाकळी येथील 6, येसगाव येथील 7, मंजूर येथील 1, कोळपेवाडी येथील 12, चांदेकसारे येथील 6, ब्राम्हणगाव येथील 7, वडगाव येथील 1, कोकमठाण येथील 5, कोर्‍हाळे येथील 1, मूर्शतपूर येथील 1, उक्कडगाव येथील 2, धारणगाव येथील 5, पोहेगाव येथील 6, कुंभारी येथील 3, बोलकी येथील 1, सोनारी येथील 3, माहेगाव येथील 5, मढी येथील 2, जेऊर पाटोदा येथील 3, अंचलगाव येथील 2, खिर्डी गणेश येथील 2, डाऊच येथील 2, कान्हेगाव येथील 1, तीनचारी येथील 1, संजीवनी येथील 1, पढेगाव येथील 1, धामोरी येथील 2, मळेगाव थडी येथील 5, चासनळी येथील 4, कोळगाव थडी येथील 2, सुरेगाव येथील 1, घोयगाव येथील 1 असे दिवसात एकूण 196 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 27 एप्रिल पर्यंत 8 हजार 381 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून सहा हजार 276 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1077 अक्टिव पेशंट आहे. आज पर्यंत 31 हजार 629 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 122 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com