कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 24 मार्च रोजी सापडलेल्या 94 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 40 तर खासगी लॅब मधील 24 तसेच अहमदनगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी 69 असे एकूण 133 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून आज अहमदनगर येथे 96 व्यक्तींचे स्त्राव पाठविण्यात आले असून तालुक्यातील शहापूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे गुरूवारी दिवसभरात एकूण 133 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील कोपरगाव येथील 23, निवारा येथील 2, सुभद्रानगर येथील 2, अंबिका नगर येथील 2, हनुमान नगर येथील 1, साठे नगर येथील 1, येवला रोड येथील 1, टिळक नगर येथील 1, साईनगर येथील 6, लक्ष्मी नगर येथील 3, दत्तनगर येथील 1, बेट येथील 1, ओम नगर येथील 1, खडकी येथील 1, राम मंदिर रोड येथील 1, बँक रोड येथील 1, महादेव मंदिर येथील 1, गुरुद्वारा रोड येथील 1, द्वारका नगरी येथील 1, ग्रामीण मधील सुरेगाव येथील 1, खिर्डी गणेश येथील 15, दहेगाव बोलका येथील 9, संवत्सर येथील 5, वारी येथील 5, तळेगाव येथील 1, माहेगाव देशमुख येथील 6, खोपडी येथील 1, तिळवणी येथील 1, कासली येथील 1, जेऊर पाटोदा येथील 3, कोकमठाण येथील 3, कोळपेवाडी येथील 4, येसगाव येथील 3, कुंभारी येथील 5, मुर्शतपुर येथील 2, ब्राह्मणगाव येथील 1, कोकमठाण येथील 1, टाकळी येथील 2, चांदगव्हाण येथील 1, धारणगाव येथील 1, शिंगणापूर येथील 3, मढी येथील 2, नाटेगाव येथील 1, सडे येथील 2, जवळके येथील 1, चांदेकसारे येथील 1, सांगवी भुसार येथील 1 , डाऊच खुर्द येथील 1 असे 133 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात 26 मार्च पर्यंत 4 हजार 132 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून तीन हजार 598 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 485 अॅक्टिव्ह पेशंट आहेत तर आज पर्यंत एकूण 23 हजार 914 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.