कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 9 डिसेंबर रोजी सापडलेल्या 10 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 60 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 7 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 1 असे 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 53 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल एकूण 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील साई नगर येथील 1, निवारा येथील 1, गजानन नगर येथील 1, तर ग्रामीण मधील सवंतसर येथील 2, चासनळी येथील 3 असे 8 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात दि. 10 डिसेंबर पर्यंत दोन हजार 549 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 441 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 17 हजार 884 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगाव तालुक्यात 42 व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.