कोपरगावात 13 जण करोना संक्रमित

corona
corona

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 24 नोव्हेंबर रोजी सापडलेल्या 14 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 77 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 6 तर खासगी लॅब मधील 7 असे एकूण 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात शहरातील बँक रोड येथील 1, गांधीनगर येथील 1, सराफबाजार येथील 4, जिजामाता ऊद्यान येथील 1, तर ग्रामीण मधील धारणगाव येथील 1, दहिगाव येथील 1, भोजडे येथील 2, येसगाव येथील 2 असे 13 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात काल दि. 25 नोव्हेंबर पर्यंत 2 हजार 339 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 218 रुग्ण बरे झाले आहेत.

तर आजपर्यंत 15 हजार 638 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 15.5 तर मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के आहे. आतापर्यंत 38 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com