कोपरगावात रुग्णवाढीला ब्रेक; 3 पॉझिटिव्ह

कोपरगावात रुग्णवाढीला ब्रेक; 3 पॉझिटिव्ह

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 17 ऑक्टोबर रोजी सापडलेल्या 6 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 20 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 1 रुग्ण पॉझिटिव्ह तर अहमदनगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी 1 तसेच खासगी लॅबमधील 1 असे 3 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 25 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील संजीवनी येथील 41 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील 20 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड येथील 46 वर्षीय महिला असे काल दिवसभरात 3 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

तर 25 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 18 ऑक्टोबरपर्यंत एकूण दोन हजार 76 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 53 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 987 रुग्ण बरे झाले आहेत.

तर आजपर्यंत एकूण 11 हजार 742 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 17.65 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.78 टक्के असे आहे. तर 37 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com